‘संगमनेर’च्या सात विद्यार्थ्यांची निवड
संगमनेर : मुंबई येथील 'अनॅलिटीकल सोल्युशन' या कंपनीने मुलाखतीद्वारे संगमनेर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील पदव्युत्तर वर्गातील (एम. एस्सी.) सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी दिली.
यावेळी कंपनीचे एच. आर. मॅनेजर डॉ. मनोज गडगे, डॉ. संतोष नेवरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. जी. के. सानप, समन्वयक प्रा. एन. डी. फटांगरे, डॉ. आर. एस. ओझा आदी उपस्थित होते. एच. आर. मॅनेजर डॉ. मनोज गडगे व डॉ. संतोष नेवरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेतल्या. या कॅम्पस इंटरव्ह्युच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. वाय. के. आभाळे, प्रा. के. टी. भारती, प्रा. ए. बी. गोसावी, प्रा. जी. जे. हासे, प्रा. एस. एस. डिचायल, प्रा. एस. एस. पानसंबळ व शिक्षकेतर सहकारी बाळासाहेब गाडेकर, गोफणे यांनी परिश्रम घेतले. डॉ. आर. एस. ओझा यांनी आभार मानले.