Breaking News

स्व.पोपटलालजी गोळेचा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने राहुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


नेवासा - पाचेगांव येथील जि.प.प्राथमिक शाळेमध्ये स्व.पोपटलालजी गोळेचा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने पद्म कैवल्यम् फौंडेशन व यश नेत्रालय राहुरी यांचेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये मोफत औषधे देखील वाटप करण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटनाअगोदर गांवातील विविध स्तरावर सामाजिक काम करणार्‍या डॉ. वाल्मिक तुवर, वामनराव तुवर, दिगंबर तुवर, दिगंबर नांदे, दिलीप पवार, अशोक कुलकर्णी, अशोक तुवर, पठाण गुरुजी, लखन मतकर, जालिंदर विधाटे, हणमंतराव वाकचौरे, सर्जेराव तुवर, पाचेगांवचे कृषीधिकारी क्षिरसागर या सत्कारमूर्तींनां पद्म कैवल्यम् फाऊंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी भानुदास महाराज गायके घोडेगांवकर, बाळकृष्ण महाराज इमामपूर, पाचेगांवच्या सरपंच सुनिता कांबळे, उपसरपंच श्रीकांत पवार, हरिभाऊ काळे या सर्वांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

या नेत्र तपासणी शिबिरात 350 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. या तपासणीसाठी राहुरीच्या नेत्रतज्ञ डॉ. सुवर्णा गोळेचा व त्यांचे सहकारी डॉ . तन्वीर पटेल, डॉ . सोनाली खाजेकर, डॉ . स्नेहल कडू, डॉ प्रतीक्षा संघवी, डॉ. शीतल दरंदले, डॉ .पारस गोळेचा, सोमनाथ काळे, मोतीलाल पंढुरे, शरद पंढुरे, बाळू घोगरे, मच्छिंन्द्र माळी यांनी शिबिरात परिश्रम घेतले.शिबिराप्रसंगी पद्म कैवल्यम् फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिता संचेती, उपाध्यक्षा चंचला साखला, वैजापूरचे उद्योगपती बाबूशेठ संचेती, राहुरीचा जागतिक क्रीडापटू अप्पासाहेब ढुस, विठ्ठल गोळेचा, प्रविण गोळेचा, विजय गोळेचा, संजय गोळेचा, दिलीप गोळेचा, सुनिल गोळेचा, शांतीलाल गोळेचा, सुभाष गोळेचा, फकिरा वरुडे, भगीरथ पवार, विठ्ठल तुवर, राजेंद्र तुवर, रशीद पटेल, ज्ञानदेव आढाव, भाऊसाहेब तुवर, रंगनाथ कुचेकर यांच्यासह महिलांमध्ये अलका गोळेचा, चित्रा गोळेचा, मंगला गोळेचा,पद्माबाई गोळेचा,जयश्री गोळेचा,सजनबाई साखला,उज्वला गोळेचा, मदनबाई लोढा,मनीषा गोळेचा, कल्पना गोळेचा, राणी गोळेचा या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश महाराज अकसाळ यांनी केले तर आभार प्रमोद गोळेचा यांनी मानले.