Breaking News

किर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघा सहकार्‍यांना अटक

मुंबई - किर्ती व्यास या 28 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश शांताराम ताम्हणकर आणि खुशी अजय सजवानी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, न्यायालयाने त्यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत किर्ती व्यास ही ग्रँटरोडच्या भारतनगर परिसरात राहत होती. अंधेरी परिसरातील एका खासगी कंपनीत ती फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत होती. दरम्यान, किर्तीने तिच्या कंपनीत काम करणार्‍या सिद्धेश आणि खुशी या दोघांना कामात सुधारणा करावी अन्यथा कारवाई होईल, अशी नोटीस दिली होती. या कंपनीत सिद्धेश एक्सेक्युटिव्ह तर खुशी अकॅडमी मॅनेजर म्हणून कामाला होती. 16 मार्चला किर्ती कामानिमित्त घराबाहेर पडली. त्या दिवशी सकाळी तिच्या आईने घरातील वायफायच्या पासवर्डकरता तिला फोन केला.