तब्बल 50 कलाकारांना पुरस्कार पोस्टाने पाठवणार
नवी दिल्ली : 65 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सहभाग न नोंदवणार्या 50 हुन अधिक कलाकारांना आता पोस्टाने प्रशस्ती पत्रक, पदक आणि चेक पाठवण्यात येणार आहे.
3 मे रोजी नवी दिल्लीत 65 वा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते मोजकेच पुरस्कार दिल्यामुळे मराठी कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. कित्येक कलाकार हे माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. या पुरस्कार सोहळ्यात 50 हुन अधिक कलाकार गैरहजर राहिले. आता या कलाकारांना पोस्टाने पुरस्कार पाठवण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला.