कर्नाटकात लिंगायत समाज ठरणार ‘किंगमेकर’
बंगळुरू - कर्नाटकात निवडणूकांचे पडघम वाजल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत. असे असले तरी कर्नाटकात मुख्यत: लिगांयत समाज किंगमेकर ठरणार असून, हा समाज ज्या पक्षांला मतदान करेल, तो पक्ष सत्ता हस्तगत करेल असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळेच कर्नाटकात लिंगायत समाजाला आपलेसे करण्यासाठी दोन्ही पक्ष मठात भेटी देतांना दिसून येत आहे.
कर्नाटकातील 224 जागांच्या विधानसभेत 100 जागांवर लिंगायत मतदारांचा प्रभाव आहे. स्वतंत्र धर्म मान्यतेचा अहवाल संमत करून सिध्दरामय्या सरकारने मतदारांना आत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार आरक्षणाचा मुद्दा मध्यवर्ती ठरला होता. त्याप्रमाणे लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेचा मुद्दा प्रचारात मूळ धरू पाहत आहे. लिंगायत समाज हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार समजला जातो. कर्नाटक सरकारने 19 मार्चला मोठी खेळी करत भाजपला धोबीपछाड दिला. नागमोहन दास समितीच्या शिफारशींचा स्वीकार केला. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकाराकडे पाठवला आहे. त्यावर गृह मंत्रालय निर्णय घेईल. कर्नाटकात 1 हजार 100 लिंगायत मठ आहेत. सिध्दागंगा आणि सुत्तूर सारखे मठ मोठे समजले जातात. त्यांच्या शैक्षणिक संस्थाची व्याप्ती मोठी आहे. अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ मठांकडून चालविल्या जाणार्या शैक्षणिक संस्थांना होणार आहे. सरकारी अनुदानाचा मार्ग मोकळा होईल तसेच सरकारच्या हस्तक्षेपाविना संस्थाचे संचलन आणि कारभार पाहता येईल. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा लिंगायत समाजाचा राज्यातील बडा चेहरा मानला जातो. सत्ताकाळात येडियुरप्पांनी मोठा निधी लिंगायत मठांना दिला आहे. लिंगायत मते वळविण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सिध्दरामय्या यांना लिंगायत मतदारांचे एकगट्ठा मतदान अपेक्षित आहे. त्याकरता गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयात त्यांनी महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्याचे सरकारी आदेश जारी केले होते. विजयपूरा येथील एका महिला विद्यापीठाला लिंगायत संत अक्का महादेवी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लिंगायत मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजकीय गणित
कर्नाटक राज्याच्या लोकसंख्येत लिंगायत समाजाचा वाटा हा 17 टक्के आहे. जवळपास 6 कोटी 50 लाख लोकसंख्या आहे. विधानसभेतील 100 जागांवर लिंगायत मतदारांचा प्रभाव आहे. त्यापैकी उत्तर कर्नाटकातील 70, मध्य आणि दक्षिण कर्नाटकातील 30 जागांचा समावेश आहे. आतापर्यंत 8 लिंगायत मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. त्यात एस. निजालिंगप्पा, जेएच पटेल, बी. एस येडियुरप्पा यांचा समावेश आहे.