Breaking News

महिला नक्षलवादी पोलिसांना शरण

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील नक्षलवादी मोठ्या प्रमाणात गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आहेत. या योजने अंर्तगत एक महिला नक्षल उपकमांडर हिंसेचा मार्ग सोडून पोलिसांना शरण आली. ज्योती उर्फ रविना जोगा पुड्यानी (वय-26), असे आत्मसमर्पण करणार्‍या महिला नक्षल उपकमांडरचे नाव आहे. ज्योतीवर राज्य शासनाने 4 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. ज्योती ही छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील शिराकुंटा येथील रहिवाशी आहे. ती 2009 मध्ये छत्तीसगडच्या भोपालपटणम दलममध्ये नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडून नक्षली संघटनेमध्ये सहभागी झाली होती. नक्षल दलममध्ये भरती झाल्यापासून तिचा नक्षली कारवायांत सक्रिय सहभाग होता. सध्या ती तेलंगणा राज्याच्या मंगी दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होती.