रस्तालूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद
महामार्गांवर वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करून पैसे लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. तालुक्यातील आंबीखालसा शिवारातील नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांनी त्याला आज {दि. ११} पहाटे पाचच्या सुमारास अटक केली. राहुल देवराम गोयकर (रा. गोयकरवाडी ता. कर्जत) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत त्याच्याकडील चारचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आळेफाटा शिवारात वाहनचालकांना मारहाण केल्यानंतर रस्तालूट करणारी एक टोळी संगमनेरच्या दिशेने गेल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस गस्त घालत असताना संगमनेरच्या दिशेने एका चारचाकी (एम. एच. ०३ सीएच २८४) वाहनातून आलेल्या चार चोरट्यांनी नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात एका उभ्या असलेल्या ट्रकचालकाला मारहाण केली. त्याच्याकडील साडेचार हजार रुपयांची रोकड घेऊन पळून जाण्याच्या बेतात असतांना समोरुन घारगाव पोलिसांची गाडी आल्याने चारही आरोपींनी चारचाकी वाहन सोडून देऊन तेथून जवळच्या डोंगराच्या दिशेने पळ काढला. चारपैकी राहुल गोयकरला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. यावेळी घटनास्थळी पोलिसांना मिळालेली कारदेखील चोरीची असल्याची शक्यता असून पोलिस त्यादृष्टीने शोध घेत आहेत. या आरोपीने यापूर्वीही याच वाहनचालकाला खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २० हजार रुपयांना लुटल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. याप्रकरणी ट्रकचालक देवीदास लक्ष्मण वाळुंज {रा. पाठपिंप्री ता. सिन्नर} याने दिलेल्या तक्रारीवरुन घारगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.