बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : आ. कोल्हे
कोपरगांव ता. प्रतिनिधी - तालुक्यात वाळूचा बेकायदा उपसा होत आहे. या न संपणा-या विषयावर विविध तर्क वितर्क पैसे देणे-घेण्यांचे बेछुट आरोप होत आहेत. अशा गलिच्छ राजकारणाची किळस येत आहे. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. ज्येष्ठ नेते शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांनी कधीही निंदा-नालस्तीचे राजकारण केले नाही. यापुढे जर सवंग प्रसिध्दीसाठी सोशलमिडियाच्या माध्यमातून बेछूट, बिनबुडाचे घाणेरडे आरोप कोणी करणार असेल तर संबंधितांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असा इशारा आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिला.
त्या म्हणाल्या, या प्रकरणाला राजकीय रंग आणि वास असल्याने याचा आम्ही निषेध करतो. वाळू उपशाप्रकरणी आज {दि. ११ } तहसिलदार किशोर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. मात्र यात वाळूतस्करांचेच वर्चस्व दिसून आरोप-प्रत्यारोपामुळे बैठकीत ब-याचदा हमरीतुमरी व वादंग झाले. त्यात ग्रामीण व शहर पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केल्याने हाणामारीपर्यंत आलेला वाद थांबला. गेल्या काही दिवसांपासून कोपरगांव शहर व तालुक्यातून बेकायदा वाळू तस्करी होत आहे. शहरातील रस्त्यावरून अवजड चोरटी वाहतुक रोखण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह वाळू आढावा बैठक घेण्याचे आवाहन आ. कोल्हे यांना केले होते, अशी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सेनेचे कैलास जाधव, गटनेते योगेश बागूल, विनायक गायकवाड, पराग संधान, जितेंद्र रणशूर, शहर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, ग्रामीणचे पो. नि. साहेबराव कडनोर आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
वहाडणे जनतेतून निवडून आल्याने कामाचा भार हलका होईल, असे वाटले होते. पण इथे तर प्रलंबित व खरकटेच धुवावे लागत आहे. बेछूट आरोपाचे धंदे बंद करा. अधिका-यांना विश्वासात घ्या. संजय काळे अभ्यासू आहेत. त्यांनी आणि वहाडणे यांनी आपल्या अभ्यासाचा उपयोग शहर विकासासाठी करावा. सोशलमिडियावर वेळ घालविण्यापेक्षा शहरहितासाठी मला भेटा. लोकप्रतिनिधी या नात्याने माझी दारे सर्वांसाठी खुली आहेत.
आ. स्नेहलता कोल्हे.