Breaking News

रेडिओ जॉकी’साठी २१ पासून प्रशिक्षण

लोणी: बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात दि.२१ ते २६ मे या कालावधीत ‘रेडिओ जॉकी’ अर्थात माध्यम सूत्रसंचालक याविषयी युवकयुवतींसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी दिली. या प्रशिक्षणामध्ये कम्युनिटी रेडिओ या प्रमुख विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी कमीत कमी दहावी ते बारावी शिक्षण असावे. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी केंद्राशी {०२४२२ २५२४१४, २५३६१२} संपर्क साधावा.