Breaking News

नाहाटाचा काटा करण्यासाठी नागवडे-पाचपुते एकत्र


श्रीगोंदा : लोणी ग्रांमपचायत निवडणूक विधान सभेसाठी जंत्री ठरणार असून, पाचपुतेंना कायमच अडचणीत आणत नागवडे यांचे तंबूत दाखल झालेले नाहाटा यांनी आपल्या मुलाला मैदानात उतरवत शिवाजीराव नागवडे यांचा शब्द मोडल्यामुळे युती तुटली. रात्री उशिरापर्यंत नागवडे कारखाण्यावर ज्येष्ठ नेते सदाशिव पाचपुते आणि नागवडे कारखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांची चर्चा झाल्याचे समजते. 

लबाडकी करत भूखंड लाटणारे आणि जनावरांच्या छावणीचे घोटाळा घालणार्‍या नाहाटाचा काटा करणेचा निर्णय झाल्याचे समजते. लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत निवडूकीमध्ये नागवडेंना मानणारा मोठा गट आहे. आ. राहूल जगताप आणि आण्णासाहेब शेलार यांनी नागवडे कारखान्याचे चेअरमण राजेंद्र नागवडे यांची भेट घेवून नाहाटा-नागवडे युती ठरली असतानाही नहाटांनी नागवडेंनाही धक्का दिल्याने याठिकाणची युती तोडल्याचे दिसून येते. लोणीची निवडणूक नाहाटा यांचे अस्तित्वाची आणि कायमच राजकीय संघर्ष असणारे नागवडे-पाचपुते यांचे प्रतिष्ठेची ठरणार आहे. नाहाटांना रसद पुरवणारा कितीही गमिनी कावा केला तरी, उघड पडणार असून तेचा वचपा नागवडे आगामी विधानसभेत घेतील हे मात्र निश्‍चित.