Breaking News

तरुणांनी महामानवांचे विचार आत्मसात करावे : कॉ. पानसरे कडूसमध्ये विविध पुरस्कारांचे वितरण


सुपा : आजच्या युगात थोर विचारवंत व महामानव पुन्हा होणे नाही, माझे बाबा गोविंद पानसरे जरी संपवले असतील तरी त्यांचे विचार जीवंत आहेत. आपल्या तरुणांनी तो विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉ. स्मिता पानसरे यांनी कडुस येथे संयुक्त जयंती सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील कडूस येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत फुले-शाहु-आंबेडकर विचारमंच कडुस आयोजित महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव तसेच विविध पुरस्कार वितरण सोहळा कडुस येथे काल पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून कॉ. स्मिता पानसरे, संतोष खोडदे, दीपक पवार, युवराज पाटील, बन्सी सातपुते, संतोष गायकवाड, राजेंद्र करंदीकर, दादा दिवटे, सरपंच पुनम मुंगसे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कै.कॉ.बाळासाहेब पाटील यांना (मरणोत्तर) ग्रामरत्न पुरस्कार देण्यात आला. समाजभूषण पुरस्कार कॉ. नारायण गायकवाड यांना देऊन सन्मानित केले. आदर्श माता पिता पुरस्कार कडुस येथील कांताबाई व रावसाहेब पंढरीनाथ रावडे तसेच पाडळी येथील सुमन व वामन दगडू जाधव या दाम्पत्यांना देण्यात आला, तसेच गणित विषयात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल शैक्षणिक पुरस्कार प्रा. संदिप विनायक यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल जाधव, दत्तात्रय जाधव, मनोज मुंगसे, बबन जाधव, शरद लंके, सुशांत शिंदे, सतिश काळे, राहुल काळे, अशोक काळे, संतोष ओव्हाळ, पप्पू जाधव, निलेश दिवटे, प्रथमेश काळे, प्रदिप काळे, गोरख व्यवहारे, संपत रावडे, कार्यकारणी अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष भाऊ काळे, राजेंद्र रावडे, संतोष मुंगसे, दादा रावडे, तुषार काळे, गौतम जाधव आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी जाधव साहेब, अ‍ॅड. मायाताई गायकवाड, राजेंद्र करंदीकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण रावडे यांनी तर सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले. त्याचबरोबर आभार प्रदीप काळे यांनी मानले.