Breaking News

पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर लागू

नवी दिल्ली - घोषित करण्यात आलेल्या दरवाढीनुसार शुक्रवारी सकाळी 6 वाजतापासून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, नॉन-ब्रँडेड पेट्रोलची किंमत वाढून दिल्लीमध्ये 75 रुपये 61 पैसे प्रति लीटर करण्यात आली आहे. बंगळुरूत 76 रुपये 83 पैसे, कोलकाता येथे 78 रुपये 29 पैसे, मुंबईत 83 रुपये 45 पैसे तर चेन्नईत 78 रुपये 46 पैसे याप्रमाणे पेट्रोलचे नवीन दर आहेत. डिझेलच्या वाढीव दरानुसार, दिल्लीत 67 रुपये 08 पैसे प्रति लीटर, बंगळुरूत 67 रुपये 23 पैसे, कोलकाता येथे 69 रुपये 63 पैसे, मुंबईत 71 रुपये 42 पैसे तर चेन्नईत 70 रुपये 80 पैसे याप्रमाणे डीझेलच्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ झाली असल्याचे वृत्त आहे. डिझेलच्या दरात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिल महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपण पेट्रोलियम पदार्थ वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते.