Breaking News

बनावट पीएचडी प्रकरण : कुलगुरूसह पाच जणावर गुन्हा दाखल

पुणे : आपापसात संगनमत करून बनावट पीएच.डी. डिग्री प्राप्त करून, तिचा वापर करून औंध परिसरातील स्पायसर ऍडवेंटीस्ट युनिवर्सिटीमध्ये पदोन्नती आणि अर्थिक फायदे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलगुरूसह पाच जणांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्येच्या माहेरघरीच हा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत ऍलन अलमेडिया (53) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्पायसर ऍडव्हेंटीस्ट युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रसाद पिल्ले, चीफ फायनान्सीयल ऑफिसर रत्नस्वामी जयेम, हेड ऑफ द डिपार्टमेंट आर्टस चाको पॉल, कात्रज येथील क्रिएटीव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक हिंदुस्थान कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च) गोपाल खंदारे आणि अन्य एक जणांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.