उत्तम पाचारणे ‘ललित कला अकादमी’च्या अध्यक्षपदी
नवी दिल्ली : ललित कलांच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ‘ललित कला अकादमी’च्या अध्यक्षपदी मराठी माणसाची वर्णी लागली आहे. आघाडीचे शिल्पकार उत्तम पाचारणे यांची राष्ट्रपतींनी या पदावर नियुक्ती केली आहे. वामन केंद्रे यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे पाचारणे यांची प्रतिष्ठित कलासंस्थेवर निवड झाल्याने राजधानीतील कला दरबारात महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. पुढील तीन वर्षे पाचारणे या पदावर कार्यरत असतील.