जितो अ.नगर आयोजित अल्पसंख्याक दर्जा सुविधा व योजना विषयी मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
जितो अ.नगरतर्फे अल्पसंख्याक दर्जा सुविधा व योजना विषयी मार्गदर्शन कार्यक्रम धार्मिक परीक्षा बोर्ड येथे झाला .यावेळी मेहता बोलत होते.या प्रसंगी जैन श्रावक संघाचे हस्तीमल मुनोत, जीतोचे विजय भंडारी,मर्चंट बँक चेअरमन संजय गांधी,संजय चोपडा,आनंदराम मुनोत,राजेंद्र चोपडा,जवाहर मुथा,विजय गुगळे, जितो नगर नूतन अध्यक्ष गौतम मुनोत , महिला विभाग मेघना मुनोत,युवा विभाग तुषार कर्नावट,जितो नगरचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मेहता म्हणाले कि,आरक्षण व अल्पसंख्याक यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे.आरक्षण हे जातीवर आधारित तर अल्पसंख्याक हे विशिष्ट समाजाच्या धर्माच्या एकून जनसंख्येवर आधारित आहे. अल्पसंख्याक दर्जाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्म म्हणून जैन नोंद आवश्यक आहे त्यासाठी शाळेत असलेल्या मुलांच्या पालकांनी जैन धर्म म्हणून नोंद करण्याचे पत्र शाळेला द्यावे त्यासाठी नोटरी व वकिलाची गरज पडत नाही तसेच इतरांनी समाजाचे विविध ट्रस्ट,मंदिर येथील पत्र घेऊन ते पुरावा म्हणून वापरावे.मौलाना आझाद फेलोशिप,नवी उडान,विदेश पढो,शैक्षणिक लोन अशा विविध योजनांची माहिती ,आवश्यक कागदपत्रे याविषयी मेहता यांनी सखोल माहिती दिली.
जीतोचे विजय भंडारी यांनी जितोच्या कार्याची माहिती दिली.सर्वात प्रथम जैन म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन संघटीत होण्याची गरज असून त्यासाठी जीतोचे सदस्य होण्याचे आवाहन केले.जीतोने देशभरातील ११५०० साधुसंताची आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.राजकारण व प्रशासकीय सेवेत समाजातील युवकांनी यावे यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत.बदलत्या व्यवसायाचे स्वरूप व नवीन पद्धती या विषयी उद्योजकांना मार्गदर्शन केले जात आहे. देशात व परदेशात मिळून एकून ९१ जितोच्या शाखा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राताविक व स्वागत जितो नगर शाखेचे गौतम मुनोत यांनी केले.अल्पसंख्याक चे महत्व ,विविध योजना व त्याविषयीचे स्वत:चे अधिकार माहिती व्हावेत ,जाणीव व जागृती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले. श्री जवाहर मुथा यांनी अतिथींचा परिचय करून दिला.आभार अमित मुथा यांनी मानले .