Breaking News

सुसंस्कृत परंपरा विकत मिळत नाही : ह. भ. प. सातारकर


सोनई : पिढ्यान पिढ्या चालत आलेली वारकरी संप्रदायमधील भगवंत सेवा ही निरंतर अंगी असावी लागते. त्यामुळेच सुसंस्कृत परंपरा उपजत प्राप्त होते. ही परंपरा बाहेर कोठेही विकत मिळत नाही, असे प्रतिपादन ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी केले.
शनिशिंगणापूर येथे शनिजयंती व होमहवन यज्ञानिमित्त आयोजित काल्याच्या किनात ते बोलत होते.याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ह. भ. प. सुनिलगिरी महाराज, भगवती सातारकर, चिन्मय सातारकर, ह. भ. प. पंढरीनाथ तांदळे, ह. भ. प.गोपाल गिरी महाराज, वारकरी साहित्य परिषदेचे सयाराम बानकर, विश्वासराव गडाख आदींसह अनेक संत महंत मोठया संख्येने उपस्थित होते.

ह. भ. प. सातारकर म्हणाले, अनेक वर्षांपासून शनेश्वर देवस्थान हिंदू धर्मात निष्ठा, भक्ती, सेवा, सुसंस्कृत परंपरा जपण्याचे कार्य करते, हीच परंपरा अंगी असली पाहिजे. काल्याच्या किर्तनातील प्रसाद सर्व एकत्र येऊन घेतलेला प्रसाद हा फक्त भूतलावर असतो, स्वर्गात नसतो. याप्रसंगी देवस्थसानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, योगेश बानकर, अप्पासाहेब शेटे, शालिनी लांडे, राजेंद्र लांडे, दीपक दरंदले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.