Breaking News

अवैध देशी दारू विक्रीवर कारवाई


संगमनेर : शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज { दि. १६} दुपारी केलेल्या कारवाईत २ हजार सातशे रुपयांच्या देशी दारूसह एकास ताब्यात घेतले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पो. उप. नि. निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संगमनेर खुर्द येथील नाशिक पुणे महामार्गावर आडवा ओढा येथे एका हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकला. 

या ठिकाणी आरोपी विजय भास्कर गुंजाळ हा देशी संत्राच्या १८० मिलीच्या ४५ बाटल्या (एकूण किंमत २७०० रुपये) विक्रीच्या उद्देशाने बाळगत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारवाईत पो. उप. नि. निकम यांच्यासह पो. कॉ. बोडखे, पो. कॉ. आढाव, आरोठे, पवार आदींचा सहभाग होता. पो. कॉ. साईनाथ तळेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. पवार करत आहे.