लंके विद्यालयास कर्मवीर पुरस्कार प्रदान
सुपा : पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सु. ग. लंके माध्यमिक व आ. ना. एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयास यंदाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उत्तर विभागातून आदर्श विद्यालयाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याबद्दल ग्रामस्थांमधून विद्यालयाचे कौतुक होत आहे.