Breaking News

क्रीडा संकुलासाठी दिली पाच एकर जमीन


सोलापूर- मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी त्यांच्या स्व मालकीची पाच एकर जमीन शहरातील क्रीडा संकुलासाठी मोफत दिली. यामुळे क्रीडा संकुलाचा रेंगाळलेला प्रश्‍न आता मार्गी लागला आहे. नगराध्यक्ष बारसकर यांचा आज 2 मे रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाची अनोखी भेट त्यांनी शासनाला देऊन अनेक खेळाडुंचे स्वप्न पूर्ण केले आहे. मोहोळ शहरासाठी क्रिडा संकुल मंजुर होऊन बरेच दिवस झाले. जिल्ह्यातील हे एकमेव क्रीडा संकुल आहे, जे जागेअभावी रखडले होते. मोहोळ शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक खेळाडु आहेत. ज्यांनी देशपातळीवर यश मिळवले आहे. मात्र त्यांना सरावासाठी जागा व पोषक वातावरण नव्हते. नगराध्यक्ष बारसकर यांनी ती अडचण ओळखुन स्व मालकीची पाच एकर जागा शासनाच्या क्रीडा विभागाला विना अट विना मोबदला दिली आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचा प्रश्‍न मार्गी लागला आले. यामुळे खेळाडूमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मोफत जमिन दिल्याचे लेखी पत्र जिल्हा क्रीडाधीकारी युवराज नाईक यांना बारसकर यांनी प्रदान केले. यावेळी उपनगराध्यक्ष शौकत तलफ दार क्रिडाशिक्षक नंदकुमार देशपांडे संभाजी चव्हाण पैलवान भरत मेकाले आदी उपस्थित होते.