अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला प्रारंभ
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेतल्या युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे हा अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना त्यांचा दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे. यानंतर मंडळाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल. यानंतर विद्यार्थी यामध्ये बदल करु शकतात.