मंत्रीद्वयांनी केले निमंत्रण पत्रिकेचे स्वागत
शासनाच्या प्लास्टिकमुक्तीच्या निर्णयाचे स्वागत करुन प्रत्यक्ष अवलंब करताना नवनाथ शिंदे यांनी २ हजार लग्नपत्रिका कापडी पिशवीसह छापल्या. प्रमुख मान्यवरांसह मित्र व नातेवाईकांना निमंत्रण देताना ‘प्लास्टिक वापरास घाला आळा ; निसर्गाचे नुकसान टाळा’ असा संदेश देत कापडी पिशवी वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.
या पिशवीवर वर-वधूचे नाव व कार्यस्थळासह ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पाणी वाचवा, स्त्री भ्रूण हत्या टाळा, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर म्हणी वा सुविचार लिहून सामाजिक प्रबोधन केले. दुग्धविकास व पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर आणि पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या निमंत्रण पत्रिकेचे विशेष कौतूक केले.