Breaking News

पीसीसीओईआरला मोस्ट रिझल्ट ओरिएंटेड इंजिनीअरींग कॉलेज इन पुणे पुरस्कार


पुणे, दि. 12, मे - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राला (पीसीसीओईआर) नवी दिल्लीमधील प्राईम टाईम ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड संस्थेच्या वतीने ‘मोस्ट रिझल्ट ओरिएंटेड इंजिनीअरींग कॉलेज इन पुणे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे युवक आणि कल्याण मंत्री चेतन चव्हाण आणि खा. अमर सिंह यांच्या हस्ते पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.


पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा (पीसीसीओईआर) निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. यावर्षी महाविद्यालयाला इंडीया बुक आ ॅफ वर्ल्ड रेकॉर्डचा एकाच वेळी 149 कॉपीराईटसची नोंद केल्याबद्दल मिळालेला पुरस्कार, महाविद्यालयाचे 84 पेटंट झाल्याची नोंद, 60 टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार तसेच यां त्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना ‘बाजा’ सारख्या राष्ट्रीय स्पर्धेत मिळालेला पाचवा क्रमांक आदी घडामोडी अवघ्या चार वर्षाच्या अल्प काळात केल्याबद्दल हा विशेष सन्मान महाविद्यालयाला मिळाला असे प्राईम टाईम ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवार्डने जाहीर केले.