Breaking News

रजपूत झोपडपट्टी ते डीपीरोड रस्ता जोडून द्यावी - आ. विजय काळे


पुणे, दि. 12, मे - जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी नदी पात्रातून रस्ता महापालिकेने करण्याचा प्रकल्प तयार हाती घेतला. रस्त्यांची कामेही काही प्रमाणात करून अर्धवट अवस्थेतील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून वाहतूक कोंडीत भर टाकली. ही कोंडी कमी करण्यासाठी रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रेपूल डीपीरोड मुख्य रस्त्याला जोडून द्या अशी मागणी आ. विजय काळे यांनी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.

आ. काळे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांना नदी पात्रातील रस्त्याची प्रत्यक्षात असलेली अवस्था जागेवर नेऊन दाखवली. त्यावेळी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, विकास आराखड्याचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर, उपायुक्त सुनील केसरी आणि पथ विभागाचे अधिकारी यावेळी त्यांच्या बरोबर होते. बाबा भिडे पूलाकडून एरंडवणेकडे येणारा रस्ता रजपूत झोपडपट्टीवरून ऐंशी फूटी डीपी रस्त्याला जोडण्याचे नियोजन होते. त्यातील शेवटचा 100 ते 200 मीटर रस्त्याच्या तुकडा तयार नसल्याने सर्व वाहने अरूंद रस्त्यावरून एका वस्तीतून क शी येतात हे आयुक्तांना आ. काळे यांनी प्रत्यक्ष दाखवले.