Breaking News

‘आय टू आय -भाऊ’ या स्पर्धेत पवन खर्डे प्रथम

कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे यांच्या ‘भाऊ’ इन्स्टिटयूटच्यावतीने आयोजित केलेल्या इग्निटेड इंनोव्हेटर्स ऑफ इंडिया या स्पर्धेमध्ये प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील महाविद्यालयात शिकत असलेल्या पवन खर्डे या विद्यार्थ्याने ‘ग्रीन इमर्जंसी डीव्हाईस’ हा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या यशाबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. 

प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे याने हे यश मिळविले. माणसाद्वारे स्प्रिंगमध्ये शक्ती साठवून त्या शक्तीचा वापर नंतर मोबाइलला चार्जिंग किंवा घरातील दिवे प्रज्वलित करण्यासाठी होत असल्याने खर्डे याच्या या प्रकल्पाचे राज्यभर कौतूक होत आहे. ग्रामीण भागात सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन समाजाला उपयोग व्हावा, यासाठी प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोहत्सान देऊन मार्गदर्शन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एअर मार्शल भूषण गोखले व भारत विकास ग्रुप चे चेअरमन अँड मॅनॅजिंग डायरेक्टर हणमंतराव गायकवाड आदी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगच्या व अन्य क्षेत्रातील विद्यार्थांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला होता.

या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनिअरिंगचे उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. आर. आर. खर्डे आदींसह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींनी पवन खर्डे याचे अभिनंदन केले.