Breaking News

तलवार बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई


कोपरगाव : शहरात तलवारीसह स्वतःचा फोटो फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील सागर हरिभाऊ सोमवंशी हा तरुण सार्वजनिक ठिकाणी एकविरा किराणा दुकानाच्या पाठीमागे, तलवार बाळगताना मिळून आला. त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली. दरम्यान, हत्यारे बाळगणार्यावर कारवाईचे सत्र सुरु ठेवणार असल्याचे पो. नि. दौलत जाधव यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक सुरेश देशमुख हे करीत आहे.