Breaking News

सिन्नर तालुक्यातील भोकणी कर्जाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या


नाशिक:- सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण साबळे वय 68 या शेतकर्‍याने मुलांच्या व स्वतःच्या नावे असणार्‍या कर्जाला कंटाळून पांगरी शिवारात असणार्‍या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
 
एकत्रित कुटुंब असलेल्या साबळे यांच्या नावावर सोसायटी कर्ज असून एका मुलाच्या नावे सोसायटी तर दुसर्‍याच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज असल्याचे समजते. या कर्जाची परतफेड कशी क रावी या विवंचनेत असलेल्या साबळे यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.