Breaking News

आरोपी अटक न झाल्याचे निषेधार्थ तहसिल कार्यालयासमोर धरणे

पाटेगाव येथील मुलगी पल्लवी हिचा विवाह मांदळी ता. कर्जत येथील अक्षय गांगर्डे यांचे बरोबर झाला होता, परंतु लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी मुलीस दि. 22 मार्च 2018 रोजी असह्य असा मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले होते. सदर घटना घडल्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळींविरोधी भा.दं.वि. कलम 306, 304, 498 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकुण चार आरोपी आहेत, परंतु कर्जत पोलिसांनी अद्यापावेतो एकाच आरोपीला अटक केली आहे, तर एका आरोपीस अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे. तर तिसरा व चौथ्या आरोपींना कर्जत पोलिसांकडून अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही. या निषेधार्थ आज सकाळी कर्जत तहसील कार्यालयात मयत पल्लवी हिचे वडील हरिदास अंबादास जाधव व गावातील असंख्य लोकांबरोबर अमरण उपोषणास बसले आहेत.
या उपोषणात हरीदास जाधव, बबन बंडगर, कल्याण किरदात, लहु फाळके, शांतीलाल बालगुडे, गणेश भोसले, संतोष भोसले, इंदुबाई जाधव, साखर भंडारे, मैनाबाई भंडारेे, लक्ष्मी बालगुडे यांच्यासह शेकडो पुरूष व महिला उपोषणास बसले आहेत.गेल्या दीड महिन्यापासुन कर्जत पोलिसांना आरोपी सापडत नाहीत, ही आश्‍चर्यकारक गोष्ट आहे. येथे डि.वाय.एस.पी. कार्यालय आहे.त्यानी दिलेला शब्दही पाळला नाही. पाटेवाडी येथील नागरीकांत डि.वाय.एस.पी. मुंढे यांच्याविषयी नाराजी होती.