Breaking News

जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी नाना पाटोळे यांची निवड

अहमदनगर - सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणार्‍या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी भास्कर उर्फ नाना पाटोळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुचविलेल्या अशासकिय सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधून पाटोळे यांची निवड करण्यात आली. पाटोळे यांचे चालू असलेले सामाजिक कार्य व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची धडपड पाहता प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी या समितीवर त्यांची नियुक्ती होण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे शिफारस केली होती. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देवून, या समितीवर त्यांना घेण्यासाठी पालकमंत्रीकडे आग्रही मागणी केली. गायकवाड यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री यांनी जिल्हा दक्षता समितीवर पाटोळे यांना सदस्यपदी घेण्याचे नाव सुचविल्याने त्यांची निवड झाली आहे.