Breaking News

वाहतुकीचे नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पाळणे गरजेचे - कैलास शिंदे


सातारा, दि. 08, मे - रस्ते अपघातात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये जास्त करुन तरुण आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांची जास्तीत जास्त जनजागृती करावी. तसेच तरुणांनी स्वत:साठी व इतरांसाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी केले. 29 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभ आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

रस्ता सुरक्षा सप्ताह हा स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम कालमर्यादेत न राहता शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये एक स्टॉल उभा करुन सर्वसामान्य जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती क रावी. शिक्षण विभागामार्फत यापुढे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक नियमांबाबत प्रबोधन करण्यात येईल. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आलेले वाहतूक नियमांचे पुस्तक प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात तसेच नागरिकांनाही उपलब्ध करुन द्यावेत. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.