Breaking News

भागवत हा भारताच्या भक्तीसंस्कृृतीचा आत्मा - डॉ. रामचंद्र देखणे


पुणे, दि. 08, मे - भागवताचा भारतीय संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आहे. शारदेचे लावण्यरत्न भांडार म्हणजे भागवत. भगवद्गीता ही ज्ञानदर्शी आहे तर भागवत हे भावदर्शी आहे. गीता आ णि भागवताचे श्रवण प्रत्येकाने नित्यनियमाने करायला हवे. शास्त्र, कथा, पुराण, काव्य यांचे संकीर्तन म्हणजे भागवत आहे. अभिजात कलांचे भागवत हे उगमस्थान आहे. त्यामुळेच भागवत हा भारताच्या अध्यात्माचा आणि भक्तीसंस्कृतीचा आत्मा आहे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे श्रीमद् भागवत आनंदी जीवन अनुभूती सप्ताह सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप मुलींच्या शाळेमध्ये करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन डॉ.देखणे यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचे यंदा आठवे वर्ष आहे.