पालकमंत्र्यांच्या जामखेड तालुक्यात कचरू अडाले शेतकर्याची आत्महत्या
जामखेड : तालुक्यातील धोत्री येथील कचरू किसन अडाले (वय 50) या शेतकर्याने कर्जाला कंटाळून धोत्री शिवारातील आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याच जामखेड मतदारसंघात रोज काही ना काही घटना का घडतात? कायदा व सुव्यवस्था अजिबात पालकमंत्र्यांच्या जामखेड तालुक्यात राहिलेला नाही. रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना जामखेड तालुक्यात घडत आहेत, यास जबाबदार कोण? अशी नाररिकांध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी जामखेडच्या महिला पोलिस कॉन्स्टेबल यांनी पेटवून घेतले, आज जामखेड तालुक्यातील धोत्री या गावचे राहिवाशी असलेले शेतकरी कचरू किसन अडाले यांनी आपल्यावर असणार्या कर्जबाजारास व आपली मुलगी लग्नाला आली असल्याने आपण अशा नाजुक परिस्थितीमध्ये तिचे लग्न कसे करणार किंवा मुलाचे शिक्षण अथवा जड झालेला प्रपंच्याचा गाडा पुढे कसा न्यायचा अशा अनेक संभ्रमातील विचार डोक्यात आल्याने घरात कोणासही न सांगता सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या शेतात असणार्या शेठे वस्तीजवळील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी जीजाबाई, एक मुलगा व लग्नाच्या वयात आलेली एक तरूण मुलगी असा परिवार असुन कचरू अडाले हे एकमेव कुटुंबाचा आधारस्तंभ होते. आणि तेच गेल्याने पत्नी व कुटुंबातील सर्वांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी जामखेड येथील ग्रामीण रूणालयात आणला असून पीएमनंतर धोत्री येथे त्यांचेवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.