छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुलींच्या हस्ते पूजन
कर्जत : छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त कर्जत येथील छ. शिवाजी महाराज चौकात पाच मुलींच्या हस्ते पूजन करण्यात आले. कर्जत येथील छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील छ. शिवाजी महाराज चौकात नरशार्दूल छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याचे पूजन राजकन्या नवले, प्रेरणा तोरडमल, हर्षदा तोरडमल, अदिती तोरडमल या छोट्या चार मुलींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिलीप कानगुडे, दादा सोनमाळी, भास्कर भैलूमे, अॅड. बापूसाहेब चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. तर विठ्ठल साळवे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास अशोक खेडकर, विजय तोरडमल, आबासाहेब लांगोरे, सुनील पवार, महेश तनपुरे, राहुल नवले, अॅड. दिपक भोसले, महेश शिंदे, गणेश तोरडमल, नवनाथ धांडे, काकासाहेब काकडे, स्वप्नील तोरडमल, भाऊसाहेब तोरडमल, दत्तात्रय भोसले, अर्जुन शिंदे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.
कर्जत येथील श्रमप्रेमींनी डिकसळ येथे सकाळी श्रमदान करून छ. संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माळराणावरील श्रमदानाच्या ठिकाणी केले, यानंतर सर्वांनी डिकसळ ग्रामपंचायतीमध्येही पूजन करून घोषणा देत प्रभातफेरी काढली. कोरेगाव येथे राजमुद्रा ग्रुपच्या वतीने छ. संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन केले. तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात पूजन करण्यात आले.