Breaking News

येडियुरप्पा यांची आज कसोटी बहुमत सिध्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश


नवी दिल्ली : कर्नाटक सत्तास्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने उद्या सायंकाळी 4 वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला काँग्रेसने ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-जेडीएसने दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी न्यायालयाने भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे राज्यपालांना दिलेल्या पत्राची विचारणा केली. रोहतगी यांनी न्यायालयासमोर 2 पत्रे सादर केली आहेत. राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण आणि अँग्लो-इंडियन प्रतिनिधीच्या नियुक्ती निर्णयाविरोधात याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. मात्र न्यायालयाने यावर सुनावणी घेण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 
दरम्यान, कर्नाटकात सत्ता स्थापनेचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्या सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने ’रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा आधार घेतला आहे.तर दुसरीकडे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजप आमदार के.जी.बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. उद्या सभागृहातील रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक होत आहे. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे, पक्ष प्रभारी गुलाब नबी आझाद हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. भाजपने आमदारांना 100 किंवा 200 कोटी रूपयांची आमिषे दाखविली तरी आमदार आमच्या सोबतच असतील. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बंगळुरूच्या दिशेने सर्व रवाना होणार आहोत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्याला बहुमत सिद्ध करण्याविषयी संपूर्ण विश्‍वास असल्याचे म्हटले आहे. ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने ’रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा आधार घेतला आहे. हैदराबाद येथे वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांना ठेवण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेस आमदारांचे हैदराबादेतील ताज कृष्णा हॉटेल येथे आगमन झाले आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमर रेड्डीदेखील या आमदारांसोबत आहेत.

‘तो’ निर्णय घटनाबाह्य असल्याचे सिद्ध : गांधी 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला असंवैधानिक वागले, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी ट्विट करत आपले मत नोंदवले. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की भाजपकडे बहुमतासाठी संख्या नसताना सरकार बनवण्याचा दावा म्हणजे भाजपचा खोटारडेपणा आहे. त्यांना कायद्याने थांबवले असले, तरी पैसा आणि दंडशक्तीचा वापर करून ते बहुमत चोरण्याचा प्रयत्न करतील. सर्वोच्च न्यायालयाने अँग्लो इंडियन समुदायाच्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडण्यास मनाई केली आहे.

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार हैदराबादमध्ये
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राहत असलेल्या बंगळुरूच्या हॉटेलची सुरक्षा काढून घेतल्यानंतर ते आता हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. बंगळुरूच्या इग्लेटन रिसॉर्टची सुरक्षा काढल्यानंतर संबंधित जेडीएससह काँग्रेसचे आमदार कालच बंगळुरूमधून बाहेर पडले होते. या आमदारांना हैदराबाद येथे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. कर्नाटक काँग्रेस आमदारांचे हैदराबादेतील ताज कृष्णा हॉटेल येथे आगमन झाले आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमर रेड्डीदेखील या आमदारांसोबत आहेत. 

मोदींनी साधला देवेगौडांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी-एसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधला आहे. तसे ट्विटदेखील नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की त्यांनी जनतादल - एसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपले माजी पंतप्रधान श्री. एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी, त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. येडियुरप्पा यांना अद्याप कर्नाटक विधानसभेत बहूमत सिद्ध करावयाचे आहे. यातच काँग्रेस आणि जेडी-एसने आरोप केला आहे, की भाजप आमच्या नवनिर्वाचित आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे.