Breaking News

संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती यांची भाजपवर टीका

नवी दिल्ली : कर्नाटकातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या निर्णयावरून वादाच्या फैरी झडत असून काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. दरम्यान, कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर बसप नेत्या मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने शपथविधीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वीजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. दरम्यान, काँग्रेस-जेडीएसने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. उद्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.