Breaking News

राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता

पुणे : मोसमी वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने आता यापुढील काळात तापमानात घट होऊन राज्यातील विविध भागात मान्सून पुर्व पावसाच्या सरी सुद्धा कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात साधारणात; हवामानात हे बदल होणार आहे. विदर्भात मात्र अजून काही दिवस तापमान उष्ण राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेले आठवड्यापासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली असली तरी उकाडा मात्र कायम होता. या पावसाने तापमानात मात्र घट झाली नव्हती. आता मात्र मोसमी वारे वाहण्यास सुरवात झाली आहे.या वार्‍यामुळे तापमानात घट होते,ज्या पश्‍चिम महाराष्ट्रात काही दिवसापुर्वी तापमान चाळीस अंशापर्यत पोहचले होते त्याठिकाणी आत तापमान हे 35 ते 37 अंशा पर्यंत खाली घसरले आहे.कोकणात तर अनेक भागात दोन ते तीन दिवसांपासून रोज पाऊस पडत आहे.मराठवाड्यातील तापमानात ही घट झाली आहे.मोसमी वारे वाहू लागल्याने आता त्याबरोबर ढग सुध्दा येताता त्यामुळे मान्सून पुर्व पावसाच्या अनूकूलतेसाठी हे वातावरण योग्य आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यामुळे राज्यात गुरुवारपासून मान्सून पुर्व पावसाचे आगमन होणार आहे. हा पाऊस कधी केव्हा कसा पडेल याचा अंदाज मात्र आत्ताच करता येणार नाही.