Breaking News

काँग्रेस आणि जेडीएसचे निदर्शने


येडियुरप्पा यांचा राजभवनात शपथविधी सुरू असताना काँग्रेसने कर्नाटक विधान भवनाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आणि जेडीएसचं धरणं आंदोलन केलं आहे. येडियुरप्पा यांच्या शपथविधीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. ही शपथविधी पार पडताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. ’बहुमत नसताना भाजप सरकार स्थापन करतंय. भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे.’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.’भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दुःख असेल’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. दरम्यान, भाजप राज्यघटनेलाही मानायला तयार नसल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर भाजप बहुमत सिद्ध करू शकत नसल्याचा दावाही सिद्धरामय्यांनी केला आहे.