Breaking News

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यामुळे काँग्रेसने जोरदार आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दिली. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाच्या शपथ ग्रहणाचे आमंत्रण दिल्यानंतर काँग्रेसने थेट न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयात सुमारे साडे तीन तास सुनावणी सुरू होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना 24 तासांच्या आत आमदारांच्या समर्थनाचे पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात यावे अशी अट घालून येडियुरप्पा यांच्या शपथविधीला मान्यता दिली. 112 आमदारांच्या समर्थनाची यादी न्यायालयात देणे भाजपसाठी सोपे नाही. बहुमत सिद्ध करणे येडियुरप्पा यांच्यासाठी एक आव्हानच आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 222 जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी भाजपला 8 जागांची गरज आहे. काँग्रेसला 78, जेडीएस 37, बसपाला 1, केपीजीपी 1 आणि अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत.