Breaking News

भोसे सेवा सोसायटी चेअरमनपदी बांगर


पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रल्हाद बांगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन बंडु शिंदे यांनी काम पाहिले. भगवान घोडके, गणपत शिंदे, बंडु शिंदे, विश्‍वनाथ शिंदे, आसाराम शिंदे, भास्कर भोसले आदी सदस्य उपस्थित होते. नूतन चेअरमन बांगर म्हणाले की, नेहमीच संस्था व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, राजकारण न आणता संस्था चालविली, त्यामुळे सभासदांनी पुन्हा संधी दिली. 18 वर्षे चेअरमन व 40 वर्षापासून सदस्य असलेल्या बांगर यांचा मावळते चेअरमन मधुकर शिंदे यांनी सन्मान केला. रंगनाथ आंधळे, भाऊसाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.