Breaking News

रेहकुरीत विद्युत तारांच्या शॉर्ट सर्कीटने 35 मेंढ्यांचा मृत्यू


कर्जत तालुक्यातील प्रसिध्द काळवीट अभयारण्य असणार्‍या रेहकुरी येथे विद्युतवाहक तारांचे शॉर्टसर्कीट होवून 35 मेंढया जागीच जळून मृत पावल्या, तर 5 मेंढ्या अत्यावस्थेत.याबाबद अधिक माहिती अशी की, रेहकुरी येथील सुभाष नारायण वाघमोडे (वय 38) हे आपले वडील नारायण आई मिराबाई पत्नी सुवर्णा व मुलाबाळांसह रेहकुरी येथे राहतात. त्यांचे वडीलांनी दिवसभर रानात मेंढया चारून सायंकाळी 6.30 वा गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधल्या व रात्री 7.30 च्या दरम्यान घरातील सर्वजण जेवण करत असताना अचानक मेंढया ओरडण्याचा आवाज आल्याने सर्वांनी मेंढयाच्या गोठ्याकडे धाव घेतली असता, गोठा पेटलेला दिसला. ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच उन्हाळा व वारा असल्याने आगीने जास्तच पेट घेतल्याने या आगीत वाघमोडे यांच्या 35 मेंढया जळून मरण पावल्या, तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. या जखमी मेंढयाचे डोळे गेले आहेत.