Breaking News

आरपीआयच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी पारनेर तालुक्यातुन जाणार हजारो कार्यकर्ते


सुपा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार दि.27 मे रोजी पुणे येथील एस.एस.पी.एम.एस. मैदानात होत असून, पारनेर तालुक्यातुन हजारो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी रवाना होणार आहेत. कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन आरपीआय(युवक) तालुकाध्यक्ष राजु उबाळे यांनी केले आहे.

रविवारी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पारनेर येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यकर्त्यांचा जथ्था अधिवेशनासाठी पुण्याला रवाना होणार आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अधिवेशन होत असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम.डी. शेवाळे, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे आदी उपस्थित राहणार आहेत. 

या अधिवेशनासाठी तालुक्यातुन युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे, ईश्‍वर गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा आशा शिंदे, नवनाथ खुपटे, अमित सोनवणे, अरविंद सोनवणे, दिपक साळवे, संतोष शिंदे, किशोर बागुल, तुषार साळवे, गोरख सुर्यवंशी, बाळासाहेब दोंदे, सतिष सुर्यवंशी आदी पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील हजारो भिमसैनिक जाणार असून, कार्यकर्त्यांना अधिवेशनासाठी येण्याचे आवाहन आरपीआयच्या वतीने करण्यात आले आहे.