‘ध्रुव’ने प्रस्थापित केला यशाचा नवा उच्चांक! रिया खिवंसरा प्रथम
।संगमनेर/प्रतिनिधी।
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२९ ) दुपारी जाहीर झाला. उज्ज्वल यशाची परंपरा अखंड जपत ‘ध्रुव’च्या विद्यार्थ्यांनी यशाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती बंद झाल्यावर संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित ही पहिलीच परीक्षा होती. ‘ध्रुव’चे १०१ विदयार्थी या परीक्षेस बसले होते. त्या सर्वांनी यश संपादन करून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये रिया प्रफुल्ल खिवंसरा ही विद्यार्थिनी ९८ टक्के गुण मिळवून शालेत प्रथम आली. प्रगती राजेश मालपाणी ९७.४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली तर रिया गणेश मालाणी व तन्वी अमित बोरा या विद्यार्थिनींनी ९६.४ टक्के गुणांसह संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय रिया प्रफुल्ल खिवंसरा व रोहित किरण बिबवे यांनी गणितात तर तन्वी अमित बोरा, श्रुती नामदेव बो-हाडे, श्रावणी निलेश देशमुख यांनी समाजशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविण्याचा विक्रम केला.
ध्रुवच्या एकूण २४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के हून अधिक गुण मिळविले. यामध्ये श्रुती नामदेव बो-हाडे (९५ टक्के), जुही धर्मेंद्र निहलानी (९४.६ टक्के), रोहित किरण बिबवे (९४.२ टक्के), वेदांत मिलिंद गुंजाळ ( ९३.४ टक्के) , निशा हेमंत शिंदे ( ९३ टक्के), नुपूर मनोज तांबे (९२.८ टक्के), अनुष्का सचिन काळे (९२.२ टक्के) आदी अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हाईस चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या उज्ज्वल यशासाठी परिश्रम घेणा-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.