Breaking News

‘रयत’ महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम


सात्रळ / प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. या महाविद्यालयाने यशस्वी निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात महाविद्यालयास यश मिळविले आहे. 

या महाविद्यालयाच्या एच. एस. सी. विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा ९१. २२ टक्के निकाल लागला. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ४४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. २१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. तसेच जे ई ई आणि नीट परीक्षेतही बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत ऋषिकेश संजय पलघडमल हा प्रथम, प्रज्ञा गोरक्ष घोलप ही द्वितीय तर अविनाश शिवाजी गुळवे हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचप्रमाणे कला शाखेत कावेरी नानासाहेब हिरगळ ही प्रथम, गायत्री अशोक मांढरे ही द्वितीय तर अनुराधा भाऊसाहेब अंत्रे आणि कल्याणी गीताराम वंजारी या तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. 

रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, विभागीय अधिकारी एस. पी. ठुबे, संभाजी चोरमुंगे, प्राचार्य एल. बी. आसावा, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन विजय कडू, बबनराव कडू, जनार्दन दिघे, भास्करराव फणसे, शांतीभाऊ गांधी, नानासाहेब दिघे, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, पर्यवेक्षक बी. बी. गोसावी, संजय डुबे आदींसह सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.