ओम गुरूदेव’१२ वीचा निकाल १०० टक्के
कोपरगाव ता. प्रतिनिधी
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित ओम गुरूदेव ज्युनिअर कॉलेच्या (विज्ञान) शाखेचा निकाल १०० टक्के लागला. श्रुती देठ हिने ८५. ५४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. संग्राम सोनवणे याने ८२. ६२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर साक्षी धनापुने हिने ८१. ८५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
ओम गुरूदेव ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेतील ११८ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यापैकी १२ विद्यार्थी विषेश प्राविण्यासह प्रथम श्रेणी तर ४७ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प. पू. ओम गुरूदेव माऊली, संतगण, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रभाकर जमधडे, वसंतराव आव्हाड, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलिक, नामदेव डांगे, सर्व शिक्षक वृंद व पालकांनी अभिनंदन केले आहे.