Breaking News

लग्नातील सत्काराला फाटा देऊन शाळेला दिली देणगी विरोली येथील गाडगे परिवाराचा नवा आदर्श

टाकळी ढोकेश्‍वर  - लग्न म्हटले की अनावश्यक खर्च समाजाच्या समाधानासाठी करावाच लागतो, असा समज ग्रामीण भागासोबत शहरी भागातही आहे. मात्र हा खर्च विनाकारण वाया जातो, तोच धागा पकडून विरोली ( ता. पारनेर ) येथील पांडुरंग सबाजी गाडगे या प्रगतशील शेतकर्‍याच्या सैन्यामध्ये भारतीय सिमेवर सेवा करणार्‍या रुपेशचे पाडळी दर्या येथील भास्कर जाधव यांची मुलगी माधुरीसोबत पारनेर येथे मंगल कार्यालयात लग्नसोहळा पार पाडला, मात्र सत्कार समारंभाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एकवीसशे रुपये देणगी देऊन, एक नवा आदर्श निर्माण केला, ग्रामस्थांनी ज्ञान मंदिर असणार्‍या जि.प. शाळेला मदत करण्याचे आवाहन केले. जि.प.चे माजी सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे यांच्या हस्ते बाबाजी डोळस यांनी देणगी स्विकारली. यावेळी कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे, प्रशांत गायकवाड उज्वला ठुबे, संजय मते, अशोक ठुबे, सखाराम ठुबे, दत्ता रसाळ, विश्‍वास रोहकले, किसन गंधाडे, राजेंद्र तारडे, पत्रकार संजय मोरे आदी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते उत्तम गाडगे, गवराम गाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.