मधुकर खरे याना कै. बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
सातारा, दि. 11, मे - मागील 18 वर्षांपासून आपल्या निर्भिड पत्रकारितेने वाचकांच्या मनावर राज्य करणारे भुईंज तालुका वाई येथील पत्रकार मधुकर खरे यांना कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कै.बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार रविवार दि.13 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथे खा. श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांचे हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
अविष्कार फौंडेशन ही भारतातील सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,आरोग्य,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून या संस्थेच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी क रून आपल्या राज्याचे,देशाचे नाव उज्वल करणार्या गुणवंत व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.
मधूकर खरे यांनी मांढरदेवी घटना,प्रतापगड आंदोलन,मराठा मोर्चा,अश्या अनेक घटनांमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून परखडपणे लिखाण केले आहे.याशिवाय मधुकर खरे यांनी रक्षकच भक्षक झाला तर,चोरावर मोर,वे टू लाईफ चा महाघोटाळा,आनेवाडी टोलनाक्यावरील 445 किलो चांदीचा पर्दाफाश,अश्या अनेक लेखमालिकाद्वारे अनेक घोटाळ्याचा पर्दाफाश करून त्यातील आरोपींना गजाआड टाकण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.याशिवाय समाजातील अनेक होतकरू आणि गुणवंत व्यक्तींबद्दल आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींबद्दल लिखाण करू न आपल्या लेखणीद्वारे अश्या व्यक्तींना मदत करून त्यांच्या कार्याचा गौरव आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केला आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात खरे यांच्या निर्भीड पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत खरे यांच्या कार्याला बळ देण्यासाठी यावर्षीचा कै.बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार खरे यांना जाहीर क रताना आम्हाला विशेष आनंद होत असून यापूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना सुद्धा प्रदान केला असल्याची माहिती पवार यांनी दिली.
पत्रकारितेतील हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मधुकर खरे यांचे अभिनंदन केले जात आहे.