Breaking News

सातार्यात 5 रुपयांत गरजूंसाठी भात-डाळ-भाजी मिळणार


सातारा, दि. 11, मे - धर्मवीर युवा मंच, वात्सल्य फाउंडेशन व हॅपी पीपल फाउंडेशन या सामाजिक संस्था या उपक्रमासाठी पुढे आल्या आहेत. त्यांनीच आर्थिक भार उचलून राजा शिवछत्रपती यांच्या नावाने हे अन्नछत्र सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून राजा शिवछत्रपती अन्नछत्र या उपक्रमास सुरवात झाली. 
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेले गरीब विद्यार्थी, रुग्णांची काळजी घेणारे नातेवाईक, कष्टाची कामे करणारा कष्टकरी कामगार, शेतमजूर, छोटे व्यावसायिक, सामान्य नागरिकांसाठी डाळ, भात व भाजी असे पोटाला आधारभूत होईल एवढे जेवण मिळणार आहे. सातार्यातील काही सामाजिक संस्थांकडून हे जेवण केवळ पाच रुपयांत मिळेल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, फोडजाई मंदिराच्या आवारात हे अन्नछत्र सुरू झाले. रोज दुपारी 12 ते दोन या वेळेतच हे अन्नछत्र सुरू राहील. रविवारी सुटी असेल.