पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)कडून पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव (ए-र्रीलींळेप) पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खाजगी विकसक ांना देण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जाणार आहे.