साई एम्प्लॉइजच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा : कोते
शिर्डी / प्रतिनिधी
येथील श्रीसाई संस्थान एम्प्लॉइज क्रेडीट को.-ऑफ सोसायटीला जवळपास ६० वर्षे पूर्ण झाली. या सोसायटीने अनेकांना रोजगार दिला. अनेकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या सोसायटीच्या प्रगतीत सेवानिवृत्त कामगारांचाही मोठा वाटा आहे, असे मत संस्थेचे चेअरमन प्रताप कोते यांनी व्यक्त केले.
संस्थेचे कर्मचारी सूर्यभान बावके आणि अण्णासाहेब घोरपडे सेवानिवृत्त झाल्याबद्दल यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हा. चेअरमन जितेंद्र गाढवे, तुषार शेळके, यादव कोते, विठ्ठल पवार, तज्ञ संचालक चंद्रकांत गुरव, सचिव डांगे आदींसह सर्व संचालक उपस्थित हजर होते.
संस्थेचे संचालक विठ्ठल पवार यांनी कामगारांच्या अडीअडचणी, पगारवाढ आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न राहील, अशी ग्वाही यावेळी दिली. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. विलास गोंदकर, मीरा कोटकर, दिनेश कानडे, दीपक धुमसे, संदीप बनसोडे, सहसचिव विलास वाणी आदी यावेळी उपस्थित होते