Breaking News

वाढत्या महागाईच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

पुणे, दि. 11, मे - माहिती अधिकार मंचच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे वाढत्या महागाईच्या विरोधात आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. महागाई व वाढच्या गुन्हेगारीबाबत सरकारचा निषेध करण्यात आला आहे. माहिती अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष अरुण माने, किरण साळवे हे या उपोषणात सहभागी झाले आहेत. या उपोषणासंदर्भात वडगाव मावळच्या तह सिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारला दिलेली आश्‍वासने पाळता आलेले नाहीत. सरकार त्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भ्रष्ट्राचारामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव रोज वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. 
गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. महिलांवर अत्याचार वाढले असून महिला वर्ग सुरक्षित नाही. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. या गोष्टींचा विचार करून सरकारने देशातील महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.