खरेदी-विक्री संघाकडून तूरडाळीची विक्री होणार
सोलापूर, दि. 11, मे - हमीभावाने शासनाने मोठ्या प्रमाणात तूरडाळ खरेदी केली आहे. ही तूरडाळ खपविण्यासाठी शासन विविध विभागाच्या वतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री संघाच्या वतीने सामान्य लोकांसाठी 60 रुपये प्रतिकिलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक तूरडाळ शासनाकडून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी भोसले यांनी घेतली. विविध विभागांसाठी दरमहा लागणारी तूरडाळ मार्केटिंग फेडरेशनकडून घ्यावी. यामध्ये दरमहा लागणारी मागणी लक्षात घेऊन त्याची एक महिना अगोदरच मागणी नोंदविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी केल्या.
समाजकल्याण विभागाकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वरण-भात पुरविला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना तूरडाळ खरेदी करावी लागते. तुरुंगातील कैद्यांसाठी, शासकीय रुग्णालयात रुग्णांना तर शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारासाठी तूरडाळीची गरज आहे. दरमहा मागणी लक्षात घेऊन प्रत्येक विभागांनी मार्केटिंग फेडरेशनकडे आपली मागणी नोंदवावी आणि तूरडाळ खरेदी करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी विभागप्रमुखांना दिल्या.